देवांग वर्तक चे दुहेरी यश..
देवांग वर्तक चे दुहेरी यश
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे ) जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल, आवरे,(इंग्रजी माध्यम )ता. उरण जि. रायगड या शाळेचा विध्यार्थी तर देवांग क्लासेस -गोवठणे चे संचालक नरेंद्र वर्तक यांचा सुपुत्र कु. देवांग नरेंद्र वर्तक हा महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे इ.आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2020-21 या परीक्षेत ग्रामीण विभागात उरण तालुक्यात पहिला तर रायगड जिल्ह्यात 14 व्या क्रमांकाने शिष्यवृत्ती मिळवून उत्तीर्ण झाला आहे.तर याच वर्षी झालेल्या N. M. M. S. (महाराष्ट्र शासन )National Means Cum -Merit Scholarship परीक्षेत चार वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे.या दुहेरी यशाबद्दल कु. देवांग नरेंद्र वर्तक व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शाळेचे, सर्व शिक्षक, कर्मचारी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवांग वर्तकचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.