शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे द्रोणागिरी शहरात स्पीड ब्रेकर..

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे द्रोणागिरी शहरात स्पीड ब्रेकर

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )द्रोणागिरी शहरात चौकाचौकात स्पीड ब्रेकर लावण्यात यावेत यासाठी शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेचे अध्यक्ष जगजीवन भोईर यांनी पोलीस उपायुक्त व सिडको प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. जगजीवन भोईर यांच्या पाठपुराव्याला आता यश आले असून उरण तालुक्यात असलेल्या द्रोणागिरी शहरात चौकाचौकात रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. स्पीड ब्रेकर नसल्याने या भागात अनेक लहान मोठे अपघात होत होते. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या. आता हा प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लागल्याने अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. व प्रवाशांना, स्थानिक नागरिकांना रस्त्यावरून सुरक्षित प्रवास करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.