शेकापचे पनवेल विधानसभा अध्यक्ष कादिरभाई कच्छी यांचे अल्पशा आजाराने निधन.

शेकापचे पनवेल विधानसभा अध्यक्ष कादिरभाई कच्छी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. शेतकरी कामगार पक्षाकडून भावपूर्ण श्रद्धांजली

शेतकरी कामगार पक्षाचे नेते कादिर भाई कच्छी यांच आज आजारपणामुळे निधन झालेलं आहे. एक मैत्रिला जागणारा कार्यकर्ता म्हणून कादिर भाईची ओळख होती.गोरगरिबांना मदत करणारा आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कुठल्याही सोहळ्यामध्ये कुठल्याही कार्यक्रमांमध्ये कुठल्याही क्षणी अतिशय निष्ठेने उतरणारा एक सहकारी कादिर भाई यांच्या रूपाने आज आम्ही गमावलेला आहे.मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कादिर भाईंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि त्यांच्या जाण्यानं अतिशय जवळचा माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा सहकारी मी व्यक्तिशः गमावलेला आहे आहे. या गोष्टीचे निश्चित पणाने दुःख मनामध्ये आहे.कादिर भाईंना विनम्र अभिवादन.!!

-श्री.बाळाराम पाटील
आमदार, कोकण शिक्षक मतदारसंघ

Leave a Reply

Your email address will not be published.