शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

दिनांक १९ जानेवारी २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननिय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवसेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरण पर्यटन व राज्यशिष्टाचार मंत्री (महाराष्ट्र राज्य) सन्माननिय आदित्य ठाकरे साहेब आणि उदयोग मंत्री सुभाष देसाई साहेब यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन व शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच खारघर शहरा मधील शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

त्याप्रसंगी शिवसेना पनवेल महानगर समन्वयक श्री. गुरुनाथ पाटील, उप महानगर प्रमुख दीपक घरत, खारघर शहर प्रमुख प्रकाश गायकवाड, उपशहर प्रमुख वैभव दळवी, प्रशांत जांभुळकर, विभाग प्रमुख संजय सावंत, राजेश बेर्डे उत्तम मोरबेकर, विभाग संघटक रामचंद्र देवरे, उप विभाप्रमुख अनिल तळवणेकर, संतोष गुजर, बंडू कोळी, सर्व उप विभाग प्रमुख शाखाप्रमुख आणि उप शाखा प्रमुख व शिवसैनिक आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…!

Leave a Reply

Your email address will not be published.