पनवेल परिसरात सामाजिक बांधिलकीचे पाणी!

पनवेल परिसरात सामाजिक बांधिलकीचे पाणी!
रामकी फाऊंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनी या ‘राष्ट्रीय मिशन’ला अमूल्य योगदान
लाखो रुपये खर्च करून सहा ठिकाणी बसवले जलशुध्दीकरण प्लांट
पनवेल, दि.19 (वार्ताहर): पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष करून शुद्ध पाणी रहिवाशांना मिळत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून रामकी फाऊंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनी यांच्या मार्फत जलशुध्दीकरण प्लांट सहा ठिकाणी बसवण्यात आले आहेत. जेणेकरून येथील ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. सी एस आर मधून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले असले तरी पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये स्वच्छ शुद्ध पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील समाविष्ट गावांमध्ये ही परिस्थिती आहे. त्यातील नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळत नाही. आजही त्या परिसरामध्ये बोरवेल वर अवलंबून रहावे लागते. किंवा तेथील विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतात. वास्तविक पाहता हे पाणी पिण्याच्या दृष्टिकोनातून शुद्ध व स्वच्छ करणे स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. परंतु निधी अभावी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. स्वच्छ सुरक्षित पिण्याच्या पाण्याची तरतूद हे एक अतिशय महत्त्वाचे क्षेत्र आहे, ज्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी भारत सरकारने ‘स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन’ सुरू केले आहे. पिण्याचे पाणी सहजासहजी उपलब्ध नसलेल्या दुर्गम गावांमध्ये आणि ग्रामीण भागात आरओ वॉटर फिल्टर प्लांट बसवून रामकी फाऊंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनी या ‘राष्ट्रीय मिशन’ला आपले अमूल्य योगदान देत आहेत. आत्तापर्यंत रामकी फाउंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनी ने तळोजा एमआयडीसी च्या आजूबाजूच्या गावांमध्ये 6 आरओ वॉटर फिल्टर प्लांट बसवले आहेत. एका आरओ वॉटर फिल्टर प्लांटची किंमत सुमारे 9 लाख रुपये आहे, अशाप्रकारे रामकी फाउंडेशनने गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी सुमारे 54 लाख रुपये खर्च केले आहेत. गरजेचे मूल्यांकन केल्यानंतर, फाउंडेशन अजूनही जवळपासच्या गावांमध्ये आरओ प्लांट बसविण्याची प्रक्रिया करत आहे. आरओ वॉटर फिल्टर प्लांट बसवल्यामुळे ग्रामस्थांचा वेळ, पैसा आणि ऊर्जा यांची बचत होतआहे व ह्याचा फायदा जवळच्या गावांना व लोकसमुदायाला मोठ्या प्रमाणात होत आहे. गावांमध्ये आरओ प्लांट बसवण्याबरोबरच, रामकी फाऊंडेशनने विविध प्रकारचे सीएसआर प्रकल्प सुरू केले आहेत . समाजातील महिला आणि तरुणांसाठी उपजीविका कार्यक्रम, टेलरिंग केंद्र आणि संगणक केंद्रे स्थापन करणे, शेतकरी क्लब स्थापन करणे आणि त्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देणे, शाळा दुरुस्तीचे काम करणे, शाळेतील शौचालये बांधणे, अश्या प्रकाराचे विवीध उपक्रम यशस्वी रित्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनीच्या सीएसआर विभागा कडून राबविण्यात येत आहे.
चौकट
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी रामकी फाऊंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. फाऊंडेशनने कोविडच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत बाधित लोकांना किराणा सामानाचे वाटप केले, तसेच पुराच्या वेळी कोकण विभागातील पूरग्रस्तांना आवश्यक साहित्याची मदत केली.कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमध्ये रामकी फाऊंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनीने लसीकरण मोहिमेसाठी लस साठवण्यासाठी एमजीएम हॉस्पिटलला आयएलआर रेफ्रिजरेटर प्रदान केले आहे.
चौकट
गावाचे नाव आरओ प्लांटची संख्या
1)सिद्धी करावले 2
2) तळोजा मजकूर 2
3) धरणा कॅम्प 1
4) पाले खुर्द 1

कोट
शुद्ध पाणी रहिवाशांना मिळत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून रामकी फाऊंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनी यांच्या मार्फत जलशुध्दीकरण प्लांट सहा ठिकाणी बसवण्यात आले आहेत. जेणेकरून येथील ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. सी एस आर मधून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
सोमनाथ मालघर
डायरेक्टर
मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी

Leave a Reply

Your email address will not be published.