रोडपाली विसर्जन तलाव रस्त्याच्या बाजूला रूग्णालयातील जैविक कचरा..

रोडपाली विसर्जन तलाव रस्त्याच्या बाजूला रूग्णालयातील जैविक कचरा
पनवेल, दि.19 (वार्ताहर): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल कचरा वाढला असून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याऐवजी शहराच्या आजू बाजूला तो टाकून दिला जात असल्याचे आढळून येत आहे. कळंबोली हून रोडपाली कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याचे आढळून आले आहे.
कोरोना संसर्गामुळे सध्या वैद्यकीय कचरा वाढला आहे़ होम असोलिशन झालेल्या लोकांचा वैद्यकीय कचरा वेगळा गोळा करण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. पीपीई किट, इंजेक्शनच्या सुया, हातमोजे, मास्क याचा वापर वाढला असल्याने त्याचा कचराही मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे़. शहरालगतच्या वस्त्यांमध्ये आणि गावांमध्ये असा वैद्यकीय कचरा गोळा करण्याची कोणतीही व्यवस्था झालेली दिसत नाही. त्याचबरोबर शहरातील कचरा ही बाहेर नेऊन टाकला जात असल्याचा संशय आहे. याबाबत रोडपाली येथील अमर ठाकुर हे दुचाकीवरुन रोडपाली वरून कळंबोली या ठिकाणी येत असता रस्त्याच्या कडेला वैद्यकीय कचरा टाकलेला आढळून येत आहे. गोळ्यांचे बॉक्स, इंजेक्शनच्या सुया, तसेच इतर वैद्यकीय साहित्य दिसत आहे. हा वैद्यकीय कचरा टाकून पर्यावरणाचा र्हास केला जात आहे.शशहरालगतच्या बाहेर अशा प्रकारे अनेक ठिकाणी वैद्यकीय कचरा टाकून दिलेला वेळोवेळी आढळून आला आहे. हा वैद्यकीय कचरा नेमका कोणी टाकला, हॉस्पिटलमधून वैद्यकीय कचरा वेगळ्या वाहनांमार्फत गोळा केला जातो.मग हा कचरा आडबाजूला जाऊन कोण फेकून देत आहे. किंवा हॉस्पिटलमधून हा कचरा फेकला जात आहे का याचा महापालिकेने शोध घेण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.