झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या सिरियलमधील अभिनेता डॉ. ज्ञानेश माने यांचं दुर्देवी निधन झालं आहे
झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या सिरियलमधील अभिनेता डॉ. ज्ञानेश माने यांचं दुर्देवी निधन झालं आहे
लागिर झालं जी’ (Lagir Jhala Ji) फेम अभिनेत्याच्या गाडीचा रोटी घाटातून प्रवास करत असताना अपघात झाला. त्यानंतर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र १४ जानेवारीला त्यांची प्राणज्योत मालवली.
झी मराठी वाहिनीवरील लागिरं झालं जी (Lagir Jhala Ji) या मालिकेतील अभिनेते डॉ. ज्ञानेश माने (Dr.Dnyanesh Mane) यांचे १४ जानेवारी रोजी अपघाती निधन झाले आहे. डॉ ज्ञानेश माने हे रोटी घाटातून प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर ते बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र १४ जानेवारी रोजी सकाळीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे बारामतीतील उत्कृष्ट आणि हरहुन्नरी कलाकार हरपल्याची खंत व्यक्त केली जात आहे.