1लाख 60 हजार रुपये किंमतीच्या लोखंडी सेट्रींग प्लेटची चोरी

1 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या लोखंडी सेट्रींग प्लेटची चोरी
पनवेल, दि.17 (संजय कदम) ः एका बिल्डींगच्या स्लॅबकरिता आणलेल्या लोखंडी सेट्रींग प्लेटची ज्याची किंमत जवळपास 1 लाख 60 हजार रुपये इतकी आहे ती अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नाना शंकर पाटील या ठेकेदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी वावंजे गाव येथील साई कुटीर बिल्डींग नं.02, गाळा नं.1 या ठिकाणी बिल्डींग स्लॅब करिता लागणारी लोखंडी सेट्रींगच्या 80 प्लेट ज्याची किंमत एकूण 1 लाख 60 हजार रुपये इतकी आहे. त्याची अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडून गाळ्यात प्रवेश करून तो माल चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.