उरण प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्षपदी राजश्री मोकल..

उरण प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्षपदी राजश्री मोकल
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी राजश्री राजेंद्र मोकल यांची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनेलचे 15 उमेदवार बहुमताने विजयी झाले. याचबरोबर उपाध्यक्षपदी अविनाश गणा कोळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळ व पदाधिकार्‍यांचा संस्थेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
नवीन कार्यकारी मंडळामध्ये नवनीत गावंड, प्रभाकर घरत, दीपक घरत, प्रशांत पाटील, मंदार रसाल, संजय पाटील, नितीन कुडावकर, केसरीनाथ दरे, रमणिक म्हात्रे, संदीप पाटील, स्वाती गायकवाड, शर्मिला गावंड, धनश्री पाटील यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात स्वाभिमानी शिक्षक पॅनेलचे सुभाष भोपी, जयदास घरत, नरेश मोकाशी, गंगाधर पाटील, निर्भय म्हात्रे, बबन पाटील, राजेंद्र मोकल, महेंद्र गावंड, संदीप जुईकर, बळीराम पाटील, के. आर. म्हात्रे, राजेंद्र शिंदे, प्रितम वर्तक, विश्‍वनाथ पाटील, भरत पाटील, रवींद्र कोळी, नितीन गायकवाड, संजय सावळे, सविता कोळी आदींनी नवनियुक्त पदाधिकारी व संचालक मंडळ यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन कविता गावंड यांनी केले.
फोटो ः राजश्री मोकल

Leave a Reply

Your email address will not be published.