मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड..

मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआडपनवेल दि.12 (संजय कदम)- पनवेल परिसरात रोखरक्कम व मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचे फोन हस्तगत करण्यात आले आहेत.         पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील महाळुंगी गाव, येथील डॉग फार्म समोरील रस्त्यावर चार अनोळखी इसमानी फिर्यादीस अडवून त्यांना मारहाण करून त्याचे खिशातील रोख रक्कम व त्याचा मोबाइल जबरीने चोरून नेल्याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाळदे व अंमलदार यांनी तांत्रिक तपास तसेच बातमीदाराकडून प्राप्त माहितीनुसार मुख्य आरोपी नामे मुद्स्सीर शेख याचे सह पाहिजे असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करता त्यांनी गुन्ह्याची सदर कबुली दिल्याने त्यांना अटक केली. यामध्ये आरोपी मुदस्सीर बशीर राऊत, वय 29 वर्ष, राहणार पटेल मोहल्ला, भारत नगर झोपडपट्टी, एमजी रोड, पनवेल., आर्यन विकास रोकडे, वय 18 वर्ष, राहणार रूम नंबर 2, जम्नोत्री बिल्डिंग, साक्षी पार्क नंबर 2, आकुरली, पो सुकापूर, पनवेल., आकाश उर्फ धोधा बेचैन चौहान, वय 19 वर्षे, राहणार शिवाजी नगर झोपडपट्टी, पनवेल एसटी स्टँडच्या मागे, पनवेल. यांना ताब्यात घेण्यात आले आहे व त्यांच्याकडून आत्तापर्यंत 3,45,000 /-रूपये किंमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या आरोपींनी कळंबोली पोलीस ठाणे हद्दीतील एका ठिकाणी वेश्यागमनासाठी येणाऱ्या आंबटशौकीन इसमांना रस्त्यात अडवून त्यांचे मोबाईल फोन व रोख रक्कम जबरीने काढून घेतल्याची कबूली दिली आहे. व सदर इसम हे त्यांची बदनामी होईल या भीतीने पोलीस ठाणेत तक्रारी करत नाही अथवा कोठेही वाच्यता करीत नसल्याचा फायदा घेऊन सदर आरोपीने अनेक जणांना लुटल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. सदर आरोपींकडून प्रस्तुत गुन्ह्यातील जबरी चोरी केलेली रोख रक्कम,मोबाइल हँडसेट व गुन्हा करताना वापरलेली ऑटोरिक्षा हस्तगत केलेली आहे. याव्यतिरिक्त सदर आरोपीकडून जबरीने चोरी केलेले विविध कंपन्यांचे एकूण 21 मोबाइल हँडसेट हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *