रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची नाहक बदनामी – शाळा व्यवस्थापनाच्या निर्णयाचे राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न

पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने घेतलेल्या फीवाढ रद्द करण्याच्या निर्णयाचे राजकीय श्रेय घेण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत आहेत. पालकांच्या आडून युवासेनेच्या काही पदाधिकार्‍यांनी स्कूल तसेच संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर यांची बदनामीकारक बातमी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आणि सामना या मुखपत्राच्या 10 मे 2020च्या अंकात दिलेली आहे. त्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

युवासेनेचे कार्यकर्ते रूपेश पाटील व त्यांचे सहकारी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी यांना 9 मे रोजी दुपारी भेटले व त्यांनी निवेदन दिले. त्याचा फोटोही ‘युवासेनेच्या दणक्यानंतर निर्णय मागे’ या आशयाखाली मिरविण्यात आला आहे. प्रत्यक्षात या तरुण मुलांना ’सीबीएसई स्कूल फीवाढीची प्रक्रिया काय असते’ याचा थांगपत्तासुद्धा नाही. महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे दर दोन वर्षांनी म्हणजेच 2018-19 आणि 2019-20 या शैक्षणिक वर्षाची अगोदर ठरलेली फी 2020-21 वर्षाकरिता रिव्हाइज (नवीन फी) करण्यासाठी स्कूल सुरू होण्यापूर्वी सहा महिने अगोदर पीटीए कमिटीच्या मिटींगमध्ये ठरवावी लागते. त्याप्रमाणे सीबीएसई स्कूल एप्रिलमध्ये सुरू होत असल्याकारणाने फी वाढविण्याचा निर्णय पीटीएच्या मिटींगमध्ये 16 नोव्हेंबर 2019 रोजी घेण्यात आला.

पीटीए कमिटीच्या सर्व सभासदांच्या एकमताने हा निर्णय होऊन त्यानुसार स्कूलमध्ये नव्या विद्यार्थ्यांची चार-पाच महिन्यांपासून अगोदरच प्रवेश प्रक्रिया होत असते. त्यानुसार बर्‍याच विद्यार्थ्यांनी प्रवेशसुद्धा घेतला.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रत्यक्ष जरी वर्ग भरले नसले, तरी 3 एप्रिलपासून ऑनलाइन वर्ग सुरू होऊन 7 एप्रिलपर्यंत सर्व वर्गांचे कामकाज व्यवस्थित वेळापत्रकाप्रमाणे झाले. तोपर्यंत सरकारचा फीवसुलीबाबत, ‘ती एकदम न भरण्याचा किंवा मागील बाकी असलेली फी ताबडतोब वसूल करू नये’, अशा प्रकारचा आदेश होता. त्याप्रमाणे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने ताबडतोब फी भरा, असा कधीही आग्रह धरला नाही.

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाल्यावर एक महिन्यानंतर मेच्या 8 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या सहीचे ‘चालू वर्षी फी वाढवू नये’ असे परिपत्रक जारी झाले. त्याच दिवशी संध्याकाळी स्कूलमधील सर्व वर्गांच्या सर्व पालकांना चालू वर्ष 2020-21करिता नवीन फी न आकारता ती जुन्या 2018-19 वर्षानुसारच चालू राहिल, असे पत्रक स्कूलकडून प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून पाठविण्यात आलेले आहे. (शाळेच्या या पत्रकाची प्रत सोबत जोडलेली आहे.)
सर्व पालकांना 8 तारखेला पत्र पाठविण्यात आले असताना 9 तारखेला रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्यांना भेटून फीवाढ मागे घ्या असे सांगण्याकरिता युवासेनेचे तीन-चार कार्यकर्ते गेले. शिवाय रामशेठ ठाकूर यांनी रूपेश पाटील किंवा कुणालाही एकही फोन केलेला नाही. 9 तारखेला हे कार्यकर्ते प्राचार्यांना निवेदन देत असताना तेथून प्राचार्यांमार्फत रामशेठ ठाकूर यांना फोन लावून फीवाढ रद्द करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे ते म्हणाले. त्यावर सरकारी पत्रक आम्हाला मिळाले. त्यामुळे फीवाढ रद्द करीत असल्याचे 8 तारखेलाच पालकांना कळविले असल्याचे आम्ही त्यांना सांगितले. तरीदेखील राजकीय स्वार्थापोटी एकेका पालकाचे तीन तीन वेळा नाव टाकून शे-सव्वाशे जण निवेदन देत असल्याचे भासविले गेले. प्रत्यक्षात त्याच्यावर एकाही पालकाची सही नाही.

खारघर परिसरात सीबीएसई शिक्षण देणार्‍या शाळांमध्ये उत्कृष्ट परंपरा निर्माण करण्याचा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या लढाईतही आम्ही पालक व विद्यार्थ्यांच्या सातत्याने सोबत राहू, अशी ग्वाही शाळा आणि संस्थेने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *