तडीपार आरोपीवर पोलिसांचा तिसरा डोळा

तडीपार आरोपीवर पोलिसांचा तिसरा डोळा

पनवेल दि.04 (वार्ताहर): गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी तडीपारीच्या कारवाई कडे पाहिले जाते. एखाद्या व्यक्तीकडून किंवा टोळीकडून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू शकते, याची खात्री पटल्यानंतर पोलिस स्टेशनपातळीवर तडीपारींचे प्रस्ताव तयार केले जातात. हे प्रस्ताव नंतर सहायक पोलिस आयुक्तांकडे जातात. याठिकाणी सहायक पोलिस आयुक्त संबंधीत गुन्हेगारांविरुद्ध नोटीस प्रसिद्ध करून कारवाई का करू नये, याची विचारणा गुन्हेगाराला करतात. गुन्हेगारांनी आपले स्पष्टीकरण दिल्यास अथवा न दिल्यास हे प्रस्ताव कारवाईसाठी पोलीस उपायुक्तांकडे पाठवले जातात. पोलीस उपायुक्त हे वैयक्तिकरित्या सदर प्रकरणाची पडताळणी करतात. या व्यक्तीकडून समाजास, जन मानसास, लोकांना भय निर्माण होत असल्याबाबत खात्री झाल्यानंतर त्याला तडीपार करण्यात येते.

          ‘तडीपार’ गुन्हेगारांवर पोलिस कारवाई करत असतात. समाजात दहशत माजविणाऱ्यांना रोखण्यासाठी तडीपारी हे पोलिसांचे प्रभावी अस्त्र आहे. काही वेळेला तडीपार केलेले आरोपी पुन्हा जिल्ह्यात परत येतात, त्यांच्यावर पोलिसांकडून पुन्हा कारवाई केली जाते.

कोणत्या महिन्यात किती ?

मोकका अंतर्गत जुलै २०२१ मध्ये पनवेल शहर पोलिसानी कारवाई केली आहे.

तडीपार कारवाई

जून आणि जुलै २०२१ मध्ये कळंबोली पोलीसानी, सप्टेंबर २०२१ मध्ये खारघर आणि पनवेल शहर पोलिसानी तर ऑक्टोबरमध्ये उरण आणि खांदेश्वर पोलिसानी तडीपारीची कारवाई केली आहे.

तडीपारावर वॉच कसा?

पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बिट अधिकारी या तड़ीपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवतात. जर तो आढळून आला तर पून्हा कायदेशीर कारवाई करण्यात येते.

ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तसेच समाजामध्ये जे क्रिमिनल अक्टिव्हिटी करतात. ज्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडते अशा लोकांना त्या हद्दीमध्ये थांबून न देता त्यांच्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. अशांवर कारवाई करण्यात आली आहे.

-शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *