300 मॉडेल्समधून मराठमोळी राधिका अशोक राणे ठरली मिस ठाणे 2021

300 मॉडेल्समधून मराठमोळी राधिका अशोक राणे ठरली मिस ठाणे 2021
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः राजधानी जयपूर येथील टोक रोड येथील हॉटेल मैरियटमध्ये चार दिवसिय ब्यूटी पेजेंट, फॅशन वीक अवॉर्ड शो फॉरएवर मिस एन्ड मिसेज इंडिया 2021 चे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेत राधिका अशोक राणे हिने मिस ठाणे 2021 (सिटी विनर) हा खिताब पटकावला.
या स्पर्धेत मराठमोळ्या राधिका राणे हिने डिजायनर ड्रेसमध्ये रँपवॉक करून सर्वांच्या नजरा आपल्याकडे खिळवून ठेवल्या. फॉरएवर मिस एन्ड मिसेज इंडिया 2021 या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या शहरांतून आलेल्या सिटी विनर्सची क्राऊनिंग सेनेमनी करण्यात आली. यावेळी या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यांच्या मतानुसार फॉरएवर रियल सुपर हीरोज व रियल सुपर वुमेल अवॉर्ड सेरेमनीच्या शेवटच्या दिवशी फॉरएवर स्टार इंडियाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात 70 पेक्षा जास्त गटांतून 250 स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले. यास्पर्धेच्या शेवटच्या दिवशी बिजनेसमैन, ’एंटरपरेन्योर, स्पोर्टस, एजुकेशन, मेडिकल, फैशन, ब्यूटी, वेलनेस, आर्ट, कल्चर, सोशल वर्क, लिटरेचर यासारख्या 70हून अधिक गटांतून 250 स्पर्धकांना प्रशस्तिपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले, अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक राजेश अग्रलवाल यांनी दिली.
कोट
300 पेक्षा जास्त मॉडल्सची पहिल्यांदाच एका मंचावर क्राऊंनिग करण्यात आली. तसेच 250 स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत मॉडेल्सची क्राऊनिंग तीन गटांत करण्यात आली. ज्यामध्ये सिटी, स्टेट आणि नॅशनल विजेत्या स्पर्धकांचा समावेश करण्यात आला होता.
-राजेश अग्रवाल, आयोजक
फोटो ः राधिका राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *