थर्टी फर्स्ट ” डिंसेबर रोजी क्रांतीज्योत महिला विकास फांउडेशन तर्फे वाहतूक नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना गुलाब पुष्प देऊन करण्यात आले सन्मानित.

“थर्टी फर्स्ट ” डिंसेबर रोजी क्रांतीज्योत महिला विकास फांउडेशन तर्फे वाहतूक नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना गुलाब पुष्प देऊन करण्यात आले सन्मानित.
पनवेल: पनवेल शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी “थर्टी फर्स्ट ” डिंसेबर रोजी क्रांतीज्योत महिला विकास फांउडेशनतर्फे पनवेल येथील आदई सर्कल जवळ कोरानाच्या पार्श्वभुमीवर शासन नियमांचे पालन करीत मास्क घालून व सोशल डिस्टन्स ठेवुन, वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना , हेल्मेट घातलेले व सीट बेल्ट लावले आहेत त्यांना गुलाब पुष्प देऊन वाहतुक नियमांचे पालन करा, वाहने सावकाश चालवा असा जाणीवपुर्वक संदेश क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे देण्यात आला आहे, जेणेकरून वाहन चालवताना अपघात होऊन दुर्घटना होणार नाही, जीवितहानी टळेल. तसेच आपले पोलीस बांधव -भगिनी थर्टी फस्टच्या दिवशी रात्री उशिरा पर्यंत ड्युटी करतात, त्यांच्याही भावनांचा आदर करून त्यांच्या सन्मानप्रीत्यर्थ त्यांनाही फाउंडेशनच्या वतीने गुलाबपुष्प देण्यात आले. फाउंडेशन मधील सर्व महिलांनी हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडला. तसेच या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी कौतुक केले व पोलीस काम करतात म्हणून यादिवशी आमचा सन्मान करणारी क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन ही एकमेव सामाजिक संस्था आमच्या निदर्शनास आली असे उदगार देखील काही अधिकाऱ्यांनी यावेळी काढले. या उपक्रमात पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी, नवीन पनवेल वाहतूक पोलीस शाखेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ . रुपालिताई शिंदे , सदस्या सौ .प्रिया गंगावणे, सदस्या सौ .यामिनी महाजन , श्री .स्नेहा धुमाळ विशेष आभार वाहतूक पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी मा. श्री. संजय नाळे सर वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारी, महिला कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *