प्रकल्पग्रस्थ,इतर प्रकल्पग्रस्थ,बेरोजगारांना नोकर भरती करा..

शिवसेना जिहाप्रमुख रायगड श्री.शिरीष घरत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी धोरणांनुसार १००% टक्के नोकर भरती स्थानिक प्रकल्पग्रस्त, इतर प्रकल्पग्रस्थ व बेरोजगारांना प्राधान्याने सामावून घेणे आवश्यक असताना, बाहेरील तालुक्यातील व जिल्ह्यातील नोकर भरती करून, स्थानिकांवर अन्याय होत आहे या संदर्भात आज पनवेल महानगरपालीका आयुक्त मा.श्री. गणेश देशमुख साहेब यांना पनवेल महानगरपालिका अंतर्गत नोकर भरती बाबत निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी महानगर प्रमुख श्री.रामदास शेवाळे, तालुका संपर्कप्रमुख श्री. योगेश तांडेल,महानगर समन्वयक श्री. गुरूनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख श्री. दिपक घरत, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन विनायक देशमुख,खारघर शहरप्रमुख प्रकाश गायकवाड, पनवेल शहर संघटक प्रवीण जाधव, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, विभाग संघटक रामचंद्र देवरे आदि पदाधिकारी उपस्थित होते…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *