करोवा कंपनी विरोधात खानावले ग्रामस्थ आक्रमक..

करोवा कंपनी विरोधात खानावले ग्रामस्थ आक्रमक
तहसीलदार कार्यालया समोर उपोषणाचा इशारा
पनवेल : ग्रामीण भाग हा देशाचा विकासाचा महत्वाचा भाग असून प्रत्येक गावाला शेजारी आता सिमेंट ची जंगले झालीत यात प्रत्येक शेतकऱ्यांचा जमिनी कवडी मोल भावाने घेतल्या गेलेल्या आहेत यात प्रत्येक शेतकऱ्याची फसवणूक झाली याचाच प्रत्यय ग्रामस्थांना आलाय.

करोवा एल एल पी.कंपनी (गोदरेज सिटी पनवेल) यांनी खानावले ग्रुप ग्रामपंचायत चे सर्व्हे नं. ४६ (गुरांचा गवंड), सर्व्हे नं. ६४ (स्मशानभूमी/ दफनभूमी), सर्व्हे नं. ४५ स्मशानभूमी ही ग्रामपंचायत पोयांजे, मौजे यांच्या ग्रामपंचायत हद्दीत १९९२ पासून ग्रामपंचायत खानावळे मधे वापरत असून करोवा एल एल पी.कंपनी (गोदरेज सिटी पनवेल) यांनी आपल्या फायद्यसाठी साठी कंपनी मधील कामगार व एक आदिवासी कर्मचारी यांस हाताशी घेऊन पंचनामा करुन घेतला यात त्या ग्रामस्थांना कुठलीही पूर्व परिस्थिती ची कल्पना न देता त्यांचा एक प्रकारे वापर करुन खानावळे गावाची फसवणूक केली आहे. सदर मंडळ अधिकारी आणि करोवा एल एल पी.कंपनी (गोदरेज सिटी पनवेल ) यांनी खोटा पंचनामा देऊन मा. जिल्हाधिकारी , मा.उपविभाग अधिकारी व मा.तहसीलदार यांची सुद्धा फसवणूक मंडळ अधिकारी संतोष पाटील व रवी खुबचंदानी व इतर ६ भागीदार यांनी करण्याचा प्रकार केला आहे . म्हणून या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून तहसीलदार कर्यालावर मोर्चा, उपोषण, आणि मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करणे असे निर्णय ग्रामस्थांच्या एक मताने झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी महादेवशेठ पाटील उपसरपंच मोहन लबडे, , पोलिस पाटील संभाजी पाटील, तंटा मुक्त अध्यक्ष काशिनाथ ठाकुर, संतोष महादेव लबडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *