फार्म हाऊस,हॉटेल,रेस्टॉरंट,रिसॉर्ट ह्यावर पोलिसांची करडी नजर.

पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील फार्म हाऊस, हॉटेल, रेस्टॉरंट , रिसॉर्ट यांची एकत्रित बैठक घेण्यात आली.
बैठकीमध्ये उपस्तिताना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या.
१) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ३१ डिसेंबर च्या अनुषंगाने सार्वजनिक करमणुकीचा कार्यक्रम व नियोजन करण्यास किंवा तशी प्रसिद्धी जाहिरात देऊ नये तसेच covid-19 व ओमायक्रोन या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता ३१ डिसेंबर 2021 व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहेत.
२) आपण आपल्या मालकीच्या ताब्यात असलेल्या जागेत नववर्षाच्या स्वागताचे निमित्त आयोजित करत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांचे जीवितास कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी आपण घ्यावी.
३) शासन महसूल व वन विभाग आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडील दिनांक २४/१२/२०२१ रोजी च्या आदेशान्वये दिलेल्या निर्देशानुसार मा.जिल्हाधिकारी सो, रायगड यांनी रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात दिनांक २४/१२/२०२१ पासून रात्री २१:०० ते सकाळी ०६:०० वा. पर्यंत बंदी लागू करण्यात आलेली आहे.
४) ३१ डिसेंबर २०२१ या दिवसाचा आनंद लुटण्यासाठी काही लोक आपले कुटुंबासह/ नातेवाईक/ मित्रपरिवार /फार्म/ फार्म हाऊसवरील स्विमिंग पूलमधील पाण्यात पोहण्यास जातात परंतु पाण्यात पडून,बुडून कोणाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील.
५) ३१ डिसेंबर २०२१ निमित्त आनंद साजरा करत असताना कोणत्याही प्रकारे जुगार खेळताना अगर दारूचे अथवा ड्रग्स सेवन करताना मिळून आल्यास अथवा डी.जे, लाऊडस्पीकर लावून मोठ्याने गोंगाट करून आजूबाजूच्या लोकांना उपद्रव करीत असताना मिळून आल्यास संबंधितावर व आपणावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
६) आपण अथवा आपल्या कुटुंबासह/नातेवाईक/ मित्रपरिवार/ हितचिंतकाकडून ३१ डिसेंबर निमित्त प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे वरील प्रमाणे शासनाने पारित केलेले आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करू नये, जेणेकरून आपलेपासून, दुसर्‍यास त्रास होऊन सार्वजनिक शांतता धोक्यात येईल.
७) कोणत्याही प्रकारचा मनोरंजनाचा अथवा अन्य कार्यक्रम विनापरवाना करताना मिळून आल्यास अगर सदर कार्यक्रमात अपघात /आक्षेपार्ह कृत्य घडल्यास त्यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरून आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
८) कोरोना संसर्गाचा (covid 19 ) चा प्रसार होऊन जनतेच्या आरोग्याची धोका निर्माण होईल असे कृत्य करू नये व शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
९) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यक्रमावेळी शासनाने पारित केलेल्या नियमांचे सोशल डिस्टंसिंग,हॅन्ड सॅनिटायझर, मास्क चा वापर या नियमांचे कार्यक्रमावेळी काटेकोरपणे पालन करणे व जास्त संख्येने नागरिक एकत्र येणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी फार्महाउस मालक आयोजक यांची राहील याची देखील सर्वांनी नोंद घ्यावी.
१०) कार पार्किंग ठिकाणी भरपूर प्रकाश व्यवस्था असावी व गाड्यांची तोडफोड ,नासधूस चोऱ्या यास प्रतिबंधक करण्यासाठी जादा सुरक्षा रक्षक नेमावेत.
११) सध्या कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन गृह विभाग यांनी ३१ डिसेंबर उत्सवाबाबत जे काही आदेश काढतील त्याचे सर्वांनी तंतोतंत करावे.
इत्यादी महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. सदर बैठकीसाठी फार्म हाऊस,हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट चे चालक/मालक असे उपस्थित होते. तसेच उपस्थितांना सीआरपीसी १४९ च्या नोटिस बजावण्यात आलेल्या आहेत. व जे फार्म हाऊस, हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, चे चालक , मालक हे सदर बैठकीला हजर राहू शकले नाहीत त्यांना नोटीस बजावण्याची तजवीज ठेवलेली आहे.

आदरपूर्वक सविनय सादर .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *