कंटेनरला यु टर्न घेताना पाठीमागचा बॉक्स चालकाच्याच केबिनवर आदळल्याने चालकाचा मृत्यू.

एकाचा मृत्यू
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः कंटेनरला यु टर्न घेताना पाठीमागचा बॉक्स चालकाच्याच केबिनवर आढळल्याने त्यात चालकाचा मृत्यू झाला आहे. पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रीती लॉजिस्टिक, आजीवली या ठिकाणी ही घटना घडली आहे. आशिष शिव प्रताप सिंग (वय 28, उत्तर प्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे.
अशीष सिंग हा त्याच्या ताब्यातील कंटेनर एमएच 46 एच 4863 हा नवकार लॉजिस्टिक कंपनी मेन गेट समोर रस्त्यावर यु टर्न घेत होता. जाग्यावर यु टर्न घेत असताना त्याच्या पाठीमागील बॉक्स त्याच्याच कॅबिनवर आदळला. या झालेल्या अपघातात चेपून आशिष सिंग याचा मृत्यू झाला. याची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *