ग्रामस्थ, नागरिकांशी चर्चा करूनच खोपटे नवेनगर क्षेत्र विकसित होणार.

ग्रामस्थ, नागरिकांशी चर्चा करूनच खोपटे नवेनगर क्षेत्र विकसित होणार.

उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )
नैना खोपटा टाऊन प्लॅनिंगच्या ॲाफीसर प्रांजली केणी यांच्या सोबत खोपटा टाऊन प्लॅनिंगबाबत उरण मधील नागरिक, ग्रामस्थांनी माहिती घेतली.त्यांना प्लॅनींगची माहिती मिळावी याबाबत निवेदन दिले.या प्रसंगी आवरे गावातील माजी उपसरपंच हरेश म्हात्रे ,वशेणी गावातील सामाजिक कार्यकर्ते शशीकांत पाटील,उरण तालुका उपाध्यक्ष भाजपा मुकुंद गावंड हे उपस्थित होते.खोपटा टॅाऊन प्लॅनिंग हे 32 गावातील गावाकऱ्यांना विश्वासात घेऊन करायचे आहे.उदाहरणार्थ गावात रस्ते,मैदान,शाळा,मंदीर,स्मशानभुमी,हॅास्पीटल, गटारे या सुविधा गावाकऱ्यांनी सूचवायच्या आहेत.डेव्हलपमेंट प्लॅन तयार होईल.याबाबतीत त्यांचे प्रतिनिधी दिवानजी पवार गावोगावी येऊन याबाबतची माहिती गावाकऱ्यांना देतील.अशी माहिती चर्चे दरम्यान देण्यात आली.नैनाच्या ॲाफीसर प्रांजली केणी मॅडम सुद्धा स्वतः येतील किंवा त्याच्यां ॲाफीसमध्ये गेलो तरी याबाबतची सर्व माहिती देणार आहेत.त्याच्यांशी उपस्थित मान्यवरांनी चर्चां केली असतां त्यांनी सांगीतले की राज्य सरकारने त्यांना नैना खोपटे टॅाऊन प्लॅन साठी सुचना दिल्या आहेत.गावाकऱ्यांशी चर्चा करून प्लॅन करायचा आहे.तीन वर्षांत गावकरी सहमत असतील तर प्लॅन तयार होईल.गावकरी तयार असतील तरच खोपटा टॅाऊन प्लॅन तयार होईल.अन्यथा होणार नाही अशा प्रकारे प्रांजली केणी मॅडम यांनी चांगल्या प्रकारे उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *