खारघरमध्ये पाईपलाईनद्वारे घरगुती स्वयंपाकच्या गॅसचे उद्घाटन…

खारघरमध्ये पाईपलाईनद्वारे घरगुती स्वयंपाकच्या गॅसचे उद्घाटन
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः खारघर सेक्टर 35 मध्ये पाईपलाईनद्वारे घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचे उद्घाटन खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनने सातत्याने अधिकार्‍यांकडे केलेल्या पाठपुराव्याचे फळ मिळाले आहे. आज केशव रेसिडेन्सी सेक्टर 35 खारघर येथे महानगर गॅसच्या वतीने प्रत्येक फ्लॅटमध्ये पाइपलाइनद्वारे रहिवाशांसाठी महानगर गॅस कनेक्शनचे उद्घाटन खारघर तळोजा कॅल वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश रानवडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
श्रीमती अन्सारी यांनी स्वयंपाकघरात गॅस बर्नर पेटवला आणि ही सुविधा सुरू झाल्यामुळे त्या उत्साहित झाल्या. ज्या सोसायट्या, रहिवासी पाइपलाइन कनेक्शन सुरू करू इच्छितात, त्यांनी महानगर गॅसशी समन्वय साधण्यासाठी खारघर तळोजा कॉलनीज वेलफेअर असोसिएशनशी संपर्क साधू शकता. केशव रेसिडेन्सीमधील अन्सारी कुटुंबाने ही नवीन सुविधा यशस्वीपणे सुरू केल्याबद्दल आणि महानगर गॅसचे आभार मानले या उद्घाटनावेळी महानगर गॅसची संपूर्ण टीम आणि केशव रेसिडेन्सीची व्यवस्थापन समितीची टीम उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *