युवा सेनेच्या दणक्यानंतर सिडकोने खारघर वसाहतीमध्ये केली नागरी समस्या सोडविण्यास सुरूवात.

युवा सेनेच्या दणक्यानंतर सिडकोने खारघर वसाहतीमध्ये केली नागरी समस्या सोडविण्यास सुरूवात
पनवेल, दि.17 (संजय कदम) ः युवा सेनेच्या दणक्यानंतर खारघर वसाहतीमधील विविध नागरी समस्या सोडविण्यास सिडकोने सुरूवात केली आहे.
खारघर शहरातील रस्ते दुरूस्ती ड्रिनेज सफाई व वृक्ष छाटणी करूण मिळण्यासंदर्भात यावेळी युवासेना पदाधिकारी युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, उपविधानसभा अधिकारी अनिकेत पाटील , खारघर शहर अधिकारी  विनोद पाटील, शहर चिटणीस  मिथुन पाटील, विभाग अधिकारी  प्रेम ठाकुर, निखील पानमंद , अजय कदम , संतोष शिंदे , सागर जाधव , योगेश महाले ,सुधीर शिंदे , विजय रोकडे , समीर वर्गट , अश्‍वीन ससाने , सुदर्शन खंडागळे , आदींनी सिडकोच्या अधिकार्‍यांची भेट घेवून या नागरी समस्या मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने खारघर शहरामधील सेक्टर 1 ते सेक्टर 24 या विभागातील पावसाळ्यामुळे रस्त्यांची खुपच दुरावस्ता झालेली आहे. खारघर शहरामधील कोणत्याही रोड वरती प्रवास केल्यास जागो जागी पडलेले खडडे वेगवेगळ्या कंपन्या मार्फत खणलेले खडडे व चरी तसेच बर्‍याच रोडवरती तर डांबर नावाचा प्रकारच राहिलेला नाही. त्यात पावसाळ्यामुळे पडलेले खडडे या सर्व बाबी मुळे वाहनांची होणारी झीज सर्वात महत्वाचे सर्व सामान्य व्यक्ती पासुन ते हाय प्रोफाईल व्यक्ती पर्यंत या खराव रोडमुळे होणारे शारिरिक आजार व्याधी तसेच रिक्षा वाहक व दुचाकी वाहन चालक यांचे होणारे अपघात व त्यांना होणारी आयुष्यभराची दुखापत या सर्व बाबींना कोण जबाबदार आहे, असा सवाल त्यांनी केला. गेल्या कित्येक वर्षा पासून खारघर शहरातील मुख्य रस्ते . मुख्य बाजार पेठा मुख्य चौक , सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी वरिल प्रमाणेच परिस्थिती आहे . त्यामुळे खारघर शहर वासीयांना रस्ता खराबी मुळे असंख्या समस्यांना तोंड दयावे लागत आहे . त्याच प्रमाणे पावसाळयामुळे खारघर शहरातील मुख्य रोडच्या आजु बाजुला व काही ठिकाणी रोडच्या मध्यभागी असनारी ड्रिनेज व्यवस्ता देखील खुप खराब झालेली आहे . कारण ड्रिनेज तुंबल्यामुळे पाणी व घाण कचरा रस्त्यावर येत असल्याने वाहन चालकांना व पायी प्रवास करणार्‍या राहीवाश्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्याच बरोबर आरोग्याचा देखील प्रश्‍न ऊदभवत आहे . डेंगु मलेरिया हिवताप या सारख्या साथींच्या आजाराला तोंड दयावे लागत आहे त्यामुळे आर्थिक नुकसानीस देखील सामोर जावे लागत आहे . खारघर शहरामध्ये ब – याच ठिकाणी रोडच्या आजुबाजुला व काही ठिकाणी दोन्ही रोडच्या मध्य भागी लावलेली शोभिवंत झाडे यांची पासाळयामुळे झालेली वाढ त्यामुळे वाहन चालकांना व प्रवास करताना या नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे . तसेच अपघातास देखील निमंत्रण देण्यासारखे होत आहे . तरी वरिल तिनही कामांची लवकरात लवकर दुरुस्ती करून खारघर मध्ये राहणार्‍या रहिवाश्यांना चांगल्या सोयी देण्यात याव्या अन्यथा खारघर युवा सेना व खारघर शिव सेना यांचे मार्फत आपल्या कार्यालयावरती वरिल तिनही कामासाठी धडक मोर्चा काढावा लागेल असा इशारा दिला होता. या इशार्‍याची दखल घेत सिडकोने आता प्रत्यक्ष वेगवेगळ्या कामांना सुरूवात केल्याने येथील रहिवाशांनी युवा सेनेचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *