चिंचवण गावातील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे लोकार्पण, शेकापचे ग्रामस्थांनी मानले आभार..

चिंचवण गावातील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे लोकार्पण, शेकापचे ग्रामस्थांनी मानले आभार

पनवेल दि.05 (वार्ताहर): पनवेल तालुक्यातील चिंचवण गावातील अंतर्गत रस्त्याचे लोकार्पण रविवारी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्तिथीत पनवेल नगरीचे मा नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे  यांच्या हस्ते करण्यात आले.

        चिंचवण गावातील हा रस्ता खराब झाल्याने त्याची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी चिंचवण ग्रामस्थ करत होते. त्यानुसार गावातील शेकापचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मा. आमदार विवेकानंद पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला व या रस्त्यासाठी रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या माध्यमातून आमदार बाळाराम पाटील  व पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य काशिनाथ पाटील  यांनी निधी उपलब्ध करून दिला. लोकार्पण कार्यक्रमासाठी आमदार बाळाराम पाटील साहेब,मा.नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे साहेब यांच्यासह पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती व संचालक रामशेठ भोईर, शेकाप जेष्ठ नेते महादेव पाटील, मा.उपसरपंच सचिन खुटले, विद्यमान सरपंच पद्माकर कातकरी, विद्यमान उपसरपंच वसंत पाटील, पुरोगामी युवक संघटना पनवेल तालुका उपाध्यक्ष अमित भोईर, उद्योगपती श्याम ठोंबरे, समाजसेवक आत्माराम घरत, मा.ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील, काशिनाथ भोईर, काशिनाथ खुटले, सदानंद खुटले, पोलीस पाटील दिलीप खुटले, शिवराम खंडाकले, संजय खंडाकले, महेश भोईर, निलेश भोईर, अनंत पोपेटा, संतोष घरत, पांडुरंग घरत, गिरीष घरत, धाऊ भोपी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या रस्त्याच्या कामाची मागणी पूर्णकेल्या बद्दल चिंचवण ग्रामस्थांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेते मंडळी व गावातील पदाधिकारी यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *