आखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने संविधान दिन महोत्सव समारोप..

पनवेल : आखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधुन 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर असा 7 दिवस “संविधान महोत्सव” आयोजित केला होता .

या महोत्सवाचा समारोप खांदा कॉलनी येथे करण्यात आला. त्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांचा कार्यक्रमातील प्रमुख वक्ते लोकशाहीर संभाजी भगत याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांच्यासोबत पनवेल नगर परिषदेचे मा.उपनगराध्यक्ष श्री.गणेश पाटील,  शेकाप खांदा कॉलनी शहर अध्यक्ष श्री.अनिल बंडगर , मा. नगरसेवक श्री.शिवाजीराव थोरवे, पुरोगामी युवक संघटना जिल्हाध्यक्ष श्री.देवा पाटील, शेकाप खांदा कॉलनी कार्याध्यक्ष श्री.योगेश कोठेकर, युवा नेते वैभव गलांडे, वासुदेव गुरव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *