स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने माता-भगिनींना साड्यांचे वाटप..

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने माता-भगिनींना साड्यांचे वाटप
पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान अर्पण केले. या दिनाचे औचित्य साधून जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल परिसरातील जवळपास 400 च्या वर माता-भगिनींना साड्यांचे वाटप करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमानिमित्ताने पनवेल तालुका व पनवेल शहर कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली. तसेच त्यांना जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासंदर्भात सर्व पदाधिकार्‍यांची बैठक झाली आहे. या कार्यक्रमाला उद्योजक राजू ठकेकर, तालुकाध्यक्ष नरेश परदेशी, शहराध्यक्ष अविनाश अडांगळे, पनवेल तालुका उपाध्यक्ष दिलीप नाईक, शहर उपाध्यक्ष भारत दाताड, शहर संघटक समाधान कांबळे, उपसंघटक शशिकांत कळवेकर, नवीन पनवेल शहराध्यक्ष दिपक रोडके, उपाध्यक्ष अशोक कदम, शहर महिला आघाडी अध्यक्षा ममताज पठाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात माता-भगिनी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *