कायद्याची ज्ञानगंगा वेगवेगळ्या ठिकाणी…

कायद्याची ज्ञानगंगा वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचविण्याचे काम पॅन इंडिया अवेरनेस प्रोग्रॅमच्या माध्यमातून संपन्न- जिल्हा न्यायाधिश आणि अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती मा. माधुरी आनंदपनवेल दि.14 (संजय कदम): पॅन इंडिया अवेरनेस प्रोग्रॅम हा गेली 45 दिवस पनवेल परिसरात राबविण्यात येत असून याच्या माध्यमातून कायद्याची ज्ञानगंगा वेगवेगळ्या ठिकाणी व प्रामुख्याने खेडोपाडी आदिवासी बांधवांकडे पोहोचविण्याचे काम संपन्न झाले असून आज त्याचा समारोप करताना एक वेगळी उर्जा घेऊन जात असल्याचे प्रतिपादन पनवेल येथील तहसिल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हा न्यायाधिश आणि अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती मा. माधुरी आनंद यांनी केली आहे.
          सदर कार्यक्रमास जिल्हा न्यायाधिश आणि अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती मा. माधुरी आनंद यांच्यासह तदर्थ जिल्हा न्यायाधिश पनवेल मा. जे.जे. मोहिते, तहसिलदार विजय तळेकर, पनवेल बार असोशिएशनचे अध्यक्ष अड. मनोज भुजबळ, पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त तृप्ती सांडभोर, सहदिवाणी न्यायाधिश आर.एस. भाकरे, सामाजिक कार्यकर्ते व इलेक्ट्रॉनिक मिडीया सेलचे अध्यक्ष रवीशेठ पाटील, अड. चंद्रकांत मढवी यांच्या सह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या निमित्ताने जिल्हा न्यायालय पनवेल येथून प्रभात फेरी काढण्यात आली. तिची सांगता पनवेल तहसिल कार्यालय येथे करण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हा न्यायाधिश आणि अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती मा. माधुरी आनंद यांनी सांगितले की, शासनाचे जे विविध उपक्रम आहेत त्यांना अनुसरून 2 ऑक्टोबर गांधी जयंती ते 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्ताने गेले 45 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बेटी बचाव, बेटी पढाव, आदिवासींना कोर्टाची माहिती देणे, कामकाजाबद्दल माहिती देणे, मोफत सल्ला मोफत कायदे तज्ञांमार्फत देणे, वृक्षारोपण आदी विविध उपक्रम राबवून कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याला लॉ स्टूडंट व सामाजिक कार्य करणाऱ्या वकिलांनीसुद्धा पाठिंबा दिला व त्यांनी कायद्याची ज्ञानगंगा पोहोचविण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना पनवेल बार असोशिएशनचे अध्यक्ष अड. मनोज भुजबळ यांनी सांगितले की, पक्षकार व वकिल यांचे संबंध चांगले असले पाहिजे, कायद्याची माहिती व त्याचा सदुपयोग करणे गरजेचे आहे. पहिल्यांदा कोर्टीत न जाता प्रथम तडजोड करून मार्ग काढावा. याने तुमचा वेळ, पैसा व मनस्ताप वाचत असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे अनुभव उपस्थितांनी सांगितले. तसेच अभियान यशस्वी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.          फोटोः काढण्यात आलेली प्रभात फेरी व तहसिल कार्यालयात मान्यवरांची उपस्थिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *