विविध नागरी समस्यांवरुन शिवसेनेची सिडको कार्यालयावर धडक ; कामे न झाल्यास आंदोलन छेडणार.

विविध नागरी समस्यांवरुन शिवसेनेची सिडको कार्यालयावर धडक ; कामे न झाल्यास आंदोलन छेडणार
पनवेल, दि.10 , कळंबोली वसाहतीमध्ये अनेक नागरी समस्या असून या संदर्भात शिवसेनेसह इतर सामाजिक संस्था, संघटनांनी सिडकोच्या अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असून, आता सिडको अधिकार्‍यानी कळंबोली जनतेचा अंत पाहू नये. येथील समस्यांबाबत अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा सिडको प्रशासन लक्ष देत नाही. शेवटी संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकार्‍यांनी सिडको अधिकार्‍यांना घेराव घालून संपूर्ण शहर फिरवून समस्यांचा पाढा वाचला. यावेळी शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले होते. कळंबोली शिवसेना शहरप्रमुख डी एन मिश्रा, गिरीश धुमाळ यांनी कार्यकारी अधिकारी विलास बनकर यांना फैलावर घेऊन तुमचे काम काय ? तुम्ही आल्यापासून काय काम केले. रस्ते खोदताना परवानगी घेतात त्यावेळी ते दुरुस्तीसाठी लागणारा खर्च आपल्याकडे जमा करतात. तो पैसा जातो कुठे. याचा लेखाजोखा मागितला.तर काही शिवसैनिकांनी बनकर हटाव कळंबोली बचाव असा सूर काढला.
शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली, कळंबोली – रोडपाली येथील मूलभूत समस्या बाबत अनेकवेळा पत्र व्यवहार करण्यात आला. त्यात कळंबोली व रोडपाली परिसरातील रस्त्याच्या झालेल्या अत्यंत दुरावस्था. कळंबोली व रोडपाली परिसरातील रस्त्याच्या स्ट्रीट लाईट बाबत तसेच फुटपाथ वरील ड्रेनेजची झाकणे तुटून गेली असून आपघात होऊन जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे तेव्हा ती बसविण्यात यावी. पाण्याच्या अनियमित व दूषित पुरवठ्या. कळंबोली विभागात असलेल्या उद्यानांच्या दयनीय अवस्था झाली आहे. कळंबोली व रोडपाली विभागातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकांवर वाढलेली झाडे, एम.एस.ई.बी तर्फे बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर भोवताली संरक्षक जाळी बसविण्यात याव्यात व महत्वाचे म्हणजे संपूर्ण कळंबोली शहराला वायूने भरलेल्या टँकरचा विळखा बसला आहे. त्यावर कारवाई करून शहराच्या प्रवेशावर हाईट गेट बसविण्यात यावेत. या समस्यांबाबत सिडकोला 3 ते 4 वेळा पक्षातर्फे निवेदने देण्यात आली होती पण याकडे सिडको प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. तेव्हा सिडको आपलीच मालमत्ता आहे असा रुबाबात असलेल्या कळंबोली येथील मस्तावल बनलेल्या सिडको अधिका-या आज शिवसेना पदाधिका-यांनी घेराव घालून येत्या 8 ते 10 दिवसात कामे झाली नाहीत तर सिडको विरोधात वसाहतीतील रहिवाशांना सोबत घेऊन शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. हे निवेदन कार्यकारी अभियंता, सिडको यांना देण्यात आले. या प्रसंगी शहर प्रमुख डी एन मिश्रा,शहर समन्वयक गिरीश दशरथ धुमाळ, उपशहर प्रमुख नारायण फडतरे,उपतालुका संघटक सौ टिया गिरीष धुमाळ,उपमहानगर समन्वयक प्रकाश चांदीवडे,शहर संघटक अरविंद कडव,विभाग प्रमुख महेश गुरव, आकाश शेलार,विभाग संघटक सुमित सूर्यवंशी,उपविभाग प्रमुख तेजस धावडे, तुषार निढाळकर, नागेश शेळके,उपशाखा प्रमुख मंगेश तलवार, उपविभाग संघटक अभिजित शिंदे, सत्यम शुक्ला, सौ मनीषा वच्कल, सौ नंदा जाधव, सौ रत्नमाला शिंदे, सौ पूनम गुप्ता इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *