अल्पवयीन मुलींसह स्त्रियांकडून वेश्यागमन करून घेणार्‍या महिलेस कामोठे पोलिसांनी केले गजाआड..

अल्पवयीन मुलींसह स्त्रियांकडून वेश्यागमन करून घेणार्‍या महिलेस कामोठे पोलिसांनी केले गजाआड
पनवेल, दि.2 अल्पवयीन मुली व स्त्रियांकडून वेश्यागमन करून घेणार्‍या एका महिलेस कामोठे पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्या ठिकाणाहून दोन अल्पवयीन मुली व तीन स्त्रियांची सुटका केली आहे.
कामोठे परिसरात अल्पवयीन मुली व स्त्रियांच्या असहाय्यतेचा फायदा घेवून पैशासाठी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती वपोनि स्मिता जाधव यांना मिळताच त्यांनी एक बनावट गिर्‍हाईक व दोन पंचांच्या साथीने खाजगी वाहनाने ऐश्‍वर्या हॉटेल सेक्टर 20 कामोठे येथे सापळा लावून सदर व्यवसाय करणारी महिला वैभवी चव्हाण (48) हिला ताब्यात घेतले असता तीने वेश्यागमनासाठी आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींची नावे तसेच तीन महिला संदर्भात माहिती दिली. त्यानुसार पोहवा प्रशांत थोरात, पो.ना.मिलींद कांबळे, पो.ना.दादा माने, मपोकॉ पवार, गावीत, वसावे आदींच्या पथकाने सदर अल्पवयीन मुलींसह महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सदर महिलेच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील अनेक गुप्तपणे चालणारे वेश्या व्यवसाय उघडकीस येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *