गरीब महिलांना साड्या वाटप होत असल्याचे सांगून फसवणूक..

गरीब महिलांना साड्या वाटप होत असल्याचे सांगून फसवणूक
पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः कामोठे परिसरातील सेक्टर 11 येथील एक महिला उडीद डाळ खरेदीकरण्यासाठी बाहेरील पडल्या होत्या. यावेळी अनोळखी इसमाने त्यांना थांबवत उभे एक शेठ गरीब महिलांना साड्या वाटणार आहे. त्यामुळे तुम्हीं अंगावरील सोने काढून द्या नाहीतर साडी मिळणार नाही. असे सांगत त्या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेऊन पसार झाल्याची घटना कामोठे परिसरात घडली आहे. याबाबत त्या महिलेने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.
रस्त्यावर पायी जाणार्‍या महिलांच्या फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या आहेत. अश्या ठकबाजांनी नवनवीन युक्त्या वापरत पोलिसासमोर आव्हान निर्माण केले आहे. कामोठे परिसरात अशीच महिलांच्या बाबतीत फसवणुकीची घटना घडली आहे. सेक्टर 11 कामोठे येथे राहणारी महिला सकाळच्या सुमारास सहयाद्री सहकारी बँकेमध्ये पैसे ट्रान्सफरसाठी निघाली होती. यावेळी बँकेमधील काम संपल्यास ती महिला तिच्या घराकडे परत निघाली असता उडीद दाळ घेयाचे असल्याचे आठवले. यावेळी एक अनोळखी इसम जवळ आला. थोड्या उशिराने त्याचा साथीदार जवळ येऊन थांबायला. यावेळी त्या महिलेला अचानक आली यावेळी त्या दोघे जवळ आले आणि म्हणाले कि या परिसरात एक शेठ शेठ येणार आहे. तो शेठ येथील गरीब महिलांना साड्यांचे वाटप करणार आहे. मात्र ज्या महिलांच्या अंगावर दागिने आहेत. त्यांना साड्या मिळणार नाही असे सांगून त्या महिलेच्या गळ्यातील सुमारे साठ हजार रुपये किमतीचे दागिने काढून दोघे भामटे सोने घेऊन पसार झाले. यावेळी त्या महिलेची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कामोठे पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार कामोठे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत अधिक तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *