फेसबुकवरुन मैत्री करून घातला 6 लाख 69 हजाराला महिलेला गंडा..

फेसबुकवरुन मैत्री करून घातला 6 लाख 69 हजाराला महिलेला गंडा
पनवेल, दि.27 (संजय कदम) ः फेसबुकवरुन मैत्री करून त्यानंतर मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधून आपण इंग्लड येथे राहत असून तुमच्याकरिता सोन्याच्या बांगड्या, अंगठी, लॅपटॉप, पर्स, कपडे पाठविले आहेत. ते पार्सल दिल्ली येथे अडकले आहे असे सांगून त्याकरिता खात्यामध्ये 6 लाख 69 हजार जमा करा असे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याची तक्रार खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नवीन पनवेलमध्ये राहणार्‍या एका महिलेची टॉनी माईक याच्याशी फेसबुकवरुन मैत्री झाली. यावेळी त्याने सदर महिलेचा मोबाईल क्रमांक घेवून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन तिच्याशी संपर्क साधून तो इंग्लड येथे राहत असल्याचे खोटे सांगून त्यांच्याकरिता 3 लाख रुपये व सोन्याच्या बांगड्या, अंगठी, लॅपटॉप, पर्स, कपडे आहेत. ते पार्सल दिल्ली येथे अडकले आहे असे सांगून त्याकरिता खात्यामध्ये 6 लाख 69 हजार जमा करा असे सांगून सदर महिलेकडून वेगवेगळ्या खाते क्रमांकामध्ये पैसे वळते करून घेवून त्यांच्या रक्कमेचा अपहार केल्याने याबाबतची तक्रार खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *