रायगड जिल्ह्यात डोलाने उभ राहतय तिर्थधाम,कंठवली येथे पार पडला कलश रोहन सोहळा

रायगड जिल्ह्यात डोलाने उभ राहतय तिर्थधाम
उद्योजक किसनभाऊ राठोड यांनी जपला अध्यात्मिक वसा
कंठवली येथे पार पडला कलश रोहन सोहळा
पनवेल दि.26 (वार्ताहर)- भाविकांना सर्व तिर्थक्षेत्राचे दर्शन एकाच ठिकाणी व्हावे, या भावनेतून प्रसिध्द उद्योजक किसनभाऊ राठोड यांनी पनवेल जवळील कांठवली येथे तीर्थ धाम उभारण्याचे ठरविले असून आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी येथे कलशारोहन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी किसनभाऊ राठोड यांनी कुटुंबीयांसह पुजेमध्ये सहभाग घेतला.
श्री क्षेत्र काशी, वाराणसी येथून शिखरासाठी याच विटा व सप्त नद्यांचे जल पूजनासाठी आणण्यात आले. त्यामुळे काशी-क्षेत्रातून येणाऱ्या शीळांचे दर्शन यावेळी भाविकांना झाले. कंठवली – विंधणे परिसरामध्ये तिर्थधामची निर्मिती होणं, हा रायगड वासियांसाठी सर्वात मोठ्ठां आनंद सोहळा आहे. तिर्थधामची निर्मिती या माध्यमातून नियमित सातत्याने होणारे उपक्रम या भागाला एक भूषणावह होणार आहे. श्रींचे मंदिर आणि मंदिराच्या व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी खर्चाची व्यवस्था म्हणून काही दुकाने व गोडाऊन हे भगवंतांच्या सेवेत बांधण्यात आली आहेत. आणि या माध्यमातून व्यवस्थापन, पूजा-अर्चा, अन्न-प्रसाद, महाप्रसाद, विविध कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, सामाजिक उपक्रम, गोरगरिबांसाठी वैद्यकीय सहाय्य, लगासाठी कन्यादान सहाय्य आणि धर्मसत्ता मजबुती करणासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत.यावेळी येथील स्थानिक ग्रामस्थ तेजस डाकी यांनी मंदिराबाबत माहिती देताना सांगितले की, ग्रामस्थांचे अनेक वर्षांपासून या परिसरात मंदिर उभे रहावे हि इच्छा आज पूर्ण झाली असून मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येथील व अनेक गोरगरिबांना या मंदिराच्या माध्यमातून मदत केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *