कळंबोलीत शेकडो राहिवाश्यांनि केला शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश .

रविवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने कळंबोली येथील आनंद मंगल सोसायटी सेक्टर-१० येथील शेकडो पुरुषांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

या वेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब यांनी सर्वांच्या हाती शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, उपतालुका संघटक आबासो लकडे, शहर समन्वयक गिरीष धुमाळ, शहर प्रमुख डी.एन. मिश्रा, शहर संघटक अक्षय साळुंखे, अरविंद कडव उपशहर प्रमुख नारायण फडतरे, विभाग प्रमुख महेश गुरव, आकाश शेलार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *