बेकायदेशीर व्यावसायिकांवर सिडकोची धडक कारवाई

बेकायदेशीर व्यावसायिकांवर सिडकोची धडक कारवाई
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः खांदा कॉलनी येथील मोकळ्या भूखंडावर असलेल्या व्यावसायिक व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांविरोधात सिडको अतिक्रमण विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. यावेळी त्याठिकाणी बांधण्यात आलेला ढाबा, गॅरेज, दुकाने जमीनदोस्त केली.
सिडकोचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहीमत पोलीस पथकाच्या सहकार्याने अचानक राबविण्यात आल्याने व्यवसायिकांची चांगलीच धावपळ उडाली. येथील व्यवसायिकांना सिडको अतिक्रमण विभागाकडून कारवाईबाबत याआधी नोटिसी दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही येथील अतिक्रमणे काढली नसल्याने सिडकोच्या अतिक्रमण विभागाने खांदा कॉलनी येथील देशी तडाखा हॉटेलच्या शेजारील असलेल्या भूखंडावर अतिक्रमण केलेल्या ढाबा, गॅरेज, दुकानदार, यांनी अतिक्रमण केले होते. यामुळे येथील अतिक्रमण वाढत चालल्या असल्याच्या त्यानुसार सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांनी अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम आणि फुटपाथवरील अतिक्रमणांकडे मोर्चा वळविला आहे. या मोहिमेत चार विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. यांच्यासह जेसीबी, ट्रक, पोलीस पथक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *