भाजी विक्री करीता जातो असे सांगून इसम बेपत्ता.

इसम बेपत्ता

पनवेल दि.17 (वार्ताहर): भाजी विक्री करीता जातो असे सांगून घराबाहेर पडलेला एक इसम अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.
अशोक वामन देशेकर (वय-40, रा.-चिंध्रण) उंची 5 फूट 2 इंच, मध्यम बांधा, डोळे काळे, नाक सरळ, केस काळे असून अंगात सफेद फूल शर्ट व काळ्या रंगाची पॅंट घातली आहे. त्याला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. सोबत एक्सेंट कार नेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलिस ठाणे 02227452444 किंवा पो.हवा. जी.डी. तांडेल यांच्याशी संपर्क साधावा.
बेपत्ता अशोक देशेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *