आदईगाव येथील रेश्मा सचिन गरुडे ह्या महीला हत्येचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

“गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल कडूनखांदेश्वर पोलीस ठाणे येथील महिलेच्याहत्येचा गुन्हा २४ तासात उघडकीस : आरोपी अटक”पनवेल दि.२५ ( वार्ताहर ) : खांदेश्वर पोलीस ठाणे हदिदृतील आदईगाव येथील महिलानामे रेश्मा सचिन गरुडे, वय- ३३ वर्षे, रा. आदई, ता. पनवेल या दिनांक २२/०५/२०२२ रोजीचे २२:०० वाजता राहत्या घरातून शतपावली करण्यास जाते म्हणून गेल्या त्या परत न आल्यानेदिनांक २३/०५/२०२२ रोजी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग ४३/२०२२ अन्वये दाखलकरण्यात आली होती. सदर मिसींग महिलेचा शोध सुरू असताना दिनांक २३/०५/२०२२ रोजीचे २२:००वा. चे सुमारास गणु पाटील रा. आदई गाव ता. पनवेल, जि. रायगड यांचे जागे मध्ये बांधकामसुरु असलेल्या चार मजली इमारतीच्या टेरेसवर नमुद महिलेचा मृतदेह मिळुन आला. सदर बाबतअज्ञात इसमा विरुद्ध खांदेश्‍वर पोलीस ठाणे येथे गु.रजि. क्र. १४४/२०२२ भा.दं.वि. कलम३०२ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.एखाद्या महिलेचा निघृण खुन होणे अशाप्रकारचा गंभिरगुन्हा तात्काळ उघडकिस आणणेबाबत मा. पोलीस आयुक्त सो. बिपीन कुमार सिंह, मा. सह. पोलीसआयुक्त सो. जय जाधव, मा. अपर पोलीस आयुक्त सो (गुन्हे) महेश धुर्ये, मा. पोलीस उप आयुक्तसो ( गुन्हे) सुरेश मेंगडे यांनी आदेशीत केले होते. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्याअनुशंगाने मा. सहा.पोलीस आयुक्त सो. (गुन्हे) विनायक वस्त यांचे मार्गदर्शनाखाली ववरिष्ठ पोलीस निरीक्षक, गिरीधर गोरे यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शाखा क्ष ०२ चे पथकानेसमांतर तपास सुरु केला. सदर गंभिर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुशंगाने एक पथक तांत्रिकतपासकामी व एक पथक घटनास्थळी भेट देवुन साक्षिदारांकडे तपास करणेकामी तयार करण्यातआले होते. तपासा दरम्यान सदरचा खुन हा इसम नामे जयंत सुरेश कोळखेकर, वय-२५ वर्षे, रा.२०१, अष्टविनायक गृहसंकुल, आदई गाव, ता. पनवेल जि. रायगड यांनी केला असलेबाबत खात्रीझाली. संशयित इसमास ताब्यात घेण्याचे अनुशंगाने गुन्हे शाखा कक्ष 0२ चे पथकाने तांत्रिकतपास करून आदडईगाव येथे सापळा लावुन नमुद आरोपीस ताब्यात घेतले. आरोपी कडे सखोल चौकशीकेली असता तो मयत महिलेची रिक्षा भाडयाने चालवित असे. त्यांच्यात झालेल्या वैयक्‍तीकवादातून त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. गुन्हे शाखा कक्ष 0२, पनवेल,नवी मुंबई चे पथकाने सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासुन न॒ थांबता, अथक परिश्रम करुन २४तासाचे आत काही एक पुरावा नसताना देखिल आरोपीस अटक करुन  गुन्हा उघडकीस आणुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आरोपीसपुढिल कार्यवाहीकामी खांदेश्वर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढिल तपासखांदेश्वर पोलीस ठाणे करीत आहेत.सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान गुन्हे शाखा कक्ष२ चे वपोनि. गिरीधर गोरे, सपोनि. संदिप गायकवाड, सपोनि. प्रविण फडतरे, पोउपनि. वैभवकुमाररोंगे, पोउपनि. मानसिंग पाटील, पोउपनि. सुदाम पाटील, पोहवा प्रशांत काटकर, पोहवा मधुकरगडगे, पोहवा रणजित पाटील, पोहवा अनिल पाटील, पोहवा ज्ञानेश्‍वर वाघ, पोहवा राजेश बैकर,पोना निलेश पाटील, पोना अजिनाथ फुंदे, पोना दिपक डोंगरे, पोना इंद्रजित कानु, पोनासचिन म्हात्रे, पोना रूपेश पाटील, पोना प्रफुल्ल मोरे, पोशि प्रविण भोपी यांनी उल्लेखनीयकामगिरी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *