कान्होबा ढाबा परिसरात आढळला महिलेचा मृतदेह.

कान्होबा ढाबा परिसरात आढळला महिलेचा मृतदेह
पनवेल दि. २५ ( संजय कदम ) : एका ३०-३५ वयोगटातील महिलेचा मृतदेह पनवेल जवळील कुंडेवहाळ गावाच्या हद्दीतील कान्होबा ढाबा परिसरात आढळून आला असून या संदर्भात पनवेल शहर पोलीस सर्वत्र शोध घेत आहेत .
सदर महिलेचे अंदाजे वय ३०-३५ वर्षे , उंची ५ फूट , मृतदेह लाल पिवळ्या हिरव्या रंगाच्या गोधरीमध्ये गुंडाळलेला , तर दोन्ही पाय पांढऱ्या रंगाच्या चिंधीने बांधलेले , तसेच तिच्या डोक्याचे केस काळे व लांब असून केसांना नारंगी रंगाचा बो आहे , डोळे नाक व दोन्ही कांन कुजलेले सडलेले आहे , तिच्या अंगात निळ्या – राखाडी रंगाचा टॉप , पांढऱ्या रंगाची ब्रा , फिक्कट गुलाबी रंगाचा पायजमा तसेच पांढऱ्या रंगाच्या चिंधीच्या लांब पट्या आहेत . या महिले बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे , फोन नंबर -०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस निरीक्षक ( प्रशासन ) दिलीप शिंदे यांच्याशी संपर्क साधावा .

Leave a Reply

Your email address will not be published.