सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त मोफत चिकित्सा शिबिराचे आयोजन.
सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त मोफत चिकित्सा शिबिराचे आयोजन
पनवेल दि. ( संजय कदम ) : पनवेल येथील सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त मोफत चिकित्सा शिबिराचे आयोजन श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून रविवार दि. १५ मे रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजे पर्यंत प्लॉट नंबर ४०० / १ , साई बाबा मंदिर , स्टेशन रोड , श्री साई नारायण बाबा आश्रम पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे .
यावेळी तज्ञ डॉक्ट्रराकडून मोफत डोळे तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप त्याच प्रमाणे मोफत मोतीबिदूचे ऑपरेशन , इ सी जी , ब्लडशुगर , बी एम डी तपासणी , एक्स -रे -स्किनीग आदी करण्यात येणार आहे . तरी याचा लाभ गरजवंतांनी घ्यावा असे आवाहन ट्रस्ट मार्फत करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी मोबाईल नंबर ९८२०९७६३८५ येथे संपर्क साधावा .