खांदेश्वर रेल्वे स्टेशन ते खांदा कॉलनी नवीन पनवेल या मार्गावर बस सेवा सुरू करण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटना आग्रही.

खांदेश्वर रेल्वे स्टेशन ते खांदा कॉलनी नवीन पनवेल या मार्गावर बस सेवा सुरू करण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटना आग्रही
पनवेल दि. ७ (वार्ताहर) : खांदा कॉलनी ते खांदेश्वर रेल्वे स्टेशन जाणाऱ्या प्रवासाची सख्या 5,000 आधिक आहे तसेच या भागात रिक्षा मीटर प्रमाणे सुरू नसल्याने प्रवास खूप महाग झाला आहे. शिवाय खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात पार्किगसाठी जागा उपलब्ध नसल्याने स्वतःची गाडी असूनही रिक्षा वर अवलंबून राहावे लागते. पेट्रोल -डिझेल च्या वाढत्या किंमती मुळे प्रवास महागला आहे. खांदा कॉलनी नवीन पनवेल मधील बस सेवा परत सुरु करावी यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन मंडळचे व्यवस्थापकाना अखिल भारतीय छावा संघटना संघटना निवेदन दिले.

यावेळी अखिल भारतीय छावा संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसाद परब, पनवेल अध्यक्ष प्रविण जठार, शशी नायर आणि महिला संघटक सुमती सरगर उपस्थित होते. आधी सुरु असलेले ५९ नंबर ची बस पुन्हा सुरु करण्याचे आश्वासन नवीमुंबई परिवहनच्यावतीने देण्यात आले. बस मार्गा , पनवेल रेल्वेस्थानक पासून अभ्युदय बँक, बांठिया विद्यालय, कालिकामाता मंदिर, अयप्पा मंदिर, तेरणा हॉस्पिटल, आदई सर्कल, शिवम आर्किट, तलाव, सूर्यदर्शन सोसायटी, आदई फाटा, डॉ.आंबेडकर उड्डाणपूल, पेट्रोल पंप, आयकर ऑफिस, मोठा खांदा, ते खांदेश्वर रेल्वेस्थानका पर्यंत असेल.

Leave a Reply

Your email address will not be published.