घरफोडीत लाखो रुपये किमतीचा ऐवज लंपास.
घरफोडीत लाखो रुपये किमतीचा ऐवज लंपास
पनवेल दि.११ (संजय कदम) : घराचे मुख्य दरवाज्याचे लॉक व कडी कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व इतर ऐवज चोरून जवळपास १ लाख १५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेण्याची घटना तालुक्यातील वलप गावात घडली आहे.
सुधीर टेंभे यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे लॉक व कडी कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व इतर ऐवज चोरून जवळपास १ लाख १५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेण्याची घटना घडल्याने या बाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.