वृद्ध महिलेसह तिच्या मुलाला करण्यात आली मारहाण.
वृद्ध महिलेसह तिच्या मुलाला करण्यात आली मारहाण
पनवेल दि.११ (वार्ताहर) : एका साठ वर्षीय वृद्ध महिलेसह तिच्या मुलाला घराचे कुंपण तोडल्याच्या समजुतीने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील वाजे येथील कातकरी वाडी येथे घडली आहे.
पप्पू कातकरी यांच्या घराचे कुंपण अनुसया किसन कातकरी (वय ६०) यांनी तोडले असल्याचे समजून त्याने तिला शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण करून तिच्या डोक्यास व दोन्ही हातास दुखापत केली तसेच त्यावेळी तिचा मुलगा रघुनाथ हा सोडवण्यासाठी गेला असता त्याला सुद्धा मारहाण केल्याने या बाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.