लोकमान्य टिळक लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पनवेल तहसील येथे अकॅडमिक विजीट.

लोकमान्य टिळक लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पनवेल तहसील येथे अकॅडमिक विजीट
पनवेल दि २८ (वार्ताहर) : लोकमान्य टिळक लॉ कॉलेज यांनी एलएलबी आणि बीएएलएलबी या विद्यार्थ्यांसाठी पनवेल तहसील कार्यालयाला अकॅडमिक विजीट आयोजित केली होती. यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी जमीन विषयक, कायदे संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या विद्यार्थ्यांची पनवेल तहसील कार्यालयात ही पहिलीच भेट होती. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील अनेक प्रश्न विचारले. यावेळी न्यायालयीन अधिकार काय असतात, महसूल संबंधातील नियम काय असतात तसेच सातबारा, आठ अ, फेरफार विषयीची माहिती, तहसीलदार विजय तळेकर यांनी लॉच्या विद्यार्थ्यांना दिली. तहसीलदार संजीव मांडे यांनीदेखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले

Leave a Reply

Your email address will not be published.