“आया वैशाखी मेळा” सोहळा उत्साहात संपन्न .

निर्वैर प्रॉडक्शन आणि व्हॅल्यू ऑफ स्माइल फाऊंडेशन, अकाल ज्योत सेवक जथा आणि चारडी कला स्पोर्ट्स अँड सोशल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “आया वैशाखी मेळा” सोहळा उत्साहात संपन्न .

पनवेल दि. २४ ( संजय कदम ) : निर्वैर प्रॉडक्शन आणि व्हॅल्यू ऑफ स्माइल फाऊंडेशन, अकाल ज्योत सेवक जथा आणि चारडी कला स्पोर्ट्स अँड सोशल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीवूड, नवी मुंबई येथे आज मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात “आया वैशाखी मेळा” सोहळा संपन्न झाला.
टाइम ग्रुपच्या प्रशंसित “टाइम आर्टिस्ट नेटवर्कने या निमित्ताने पाच नवीन उदयोन्मुख संगीत प्रतिभांना लोकांपुढे आणले *आगामी वेब मालिका आणि चित्रपट “तस्करी आणि गोल गप्पे” चे पोस्टर्स आणि ट्रेलरचे प्रेक्षकांपुढे अनावरण करण्यात आले . तसेच नवी मुंबई मध्ये सुप्रसिद्ध पंजाबी गायक, रंधावा ब्रदर्स, मनजीत सिंग सोही आणि कबाल सरूपवाली यांनी काही चमकदार बैसाखी आणि त्यांची इतर सुप्रसिद्ध गाणी ऐकून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. रजत बेदी, अभिनेता आणि निर्माता (कोई मिल गया, पार्टनर, जोडी नंबर, आंतरराष्ट्रीय खिलाडी), अभिनेत्री इहाना ढिल्लन (राधे, भुज, हेट स्टोरी), अभिनेत्री जास्मिन भसीन (नागिन, बिग बॉस, खतरों के खिलाड़ी), एम चंद्रमौली (केजीएफच्या अध्याय १ आणि २ चे लेखक), चिता यजेश शेट्टी अभिनेता, निर्माता आणि एक्का मार्शल आर्ट तज्ज्ञ आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते सिमरजीत सिंग आणि अमृत राज सिंग आदिंची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती. त्याचप्रमाणे माजी खासदार संजीव नाईक,निर्वैर प्रॉडक्शन हरदीप संधू ,टाइम ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण शहा ,कौस मिडीयाच्या सीईओ श्रीदेवी शेट्टी भाजप युवा नेता हँप्पी सिंग यांच्या सह पंजाबी सिने श्रुष्टीतील अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.