तळोजा येथील मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तान हस्तांतरित करून दफन विधी खुली करण्यासाठी मंजूरी.

तळोजा येथील मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तान हस्तांतरित करून दफन विधी खुली करण्यासाठी मंजूरी, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश

पनवेल : पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा १९ एप्रिल रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. या सभेत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यानी मागणी केलेल्या तळोजा येथील मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तान हस्तांतरित करून दफन विधी खुली करण्यासाठी मंजूरी मिळाली.

      पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा फेस 1, सेक्टर 15 येथील भूखंड क्रमांक आठ/ नऊ येथे सिडको प्राधिकरणामार्फत सुसज्ज दफनभूमी तयार करण्यात आली आहे. पालिकेने सिडकोसोबत हस्तांतरणाची कार्यवाही केली नसल्याने कब्रस्तान दफन विधी करता खुले करण्यात आले नाही. त्यामुळे परिसरातील मुस्लिम समाज बांधवांना दफन विधी करता पनवेल, खारघर , मुंबई येथे जावे लागते त्यामुळे कुटुंबीयांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तळोजा येथील मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तान हस्तांतरित करून दफन विधी खुली करण्यासाठीची मागणी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, नगरसेवक सतीश पाटील यानी केली होती. या मागणीला सर्वसाधारण सभेत मंजूरी मिळाली आहे. नगरसेवक सतीश पाटील, डॉ सुरेखा मोहोकर यांच्यासह महाविकास आघाडीने विशेष प्रयत्न करून कब्रस्तान हस्तांतरित करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. कब्रस्तान आणि अग्निशामक दलासाठी वाहन खरेदी करण्यासाठी मंजूरी मिळाल्याबाबत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, नगरसेवक सतीश पाटील आणि महाविकास आघाडीने आयुक्त गणेश देशमुख, प्रशासन यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.