पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने केली जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम.

पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने केली जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
पनवेल, दि.22 (संजय कदम) ः सध्याच्या महाराष्ट्रासह देशभरात होत असलेल्या विविध घटनांच्या पार्श्‍वभूमीवर सर्तकता म्हणून पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने आज त्यांच्या हद्दीतील मौजे ः वावंजे या ठिकाणी जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम केली.
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वावंजे याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या नेतृत्वाखाली जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. सदर दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीत पो ठाणे कडील 02 पोनि, 01 सपोनि, 02 पोउपनि, 15 पोलीस अंमलदार, तसेच तळोजा एमआयडीसी कडील अग्निशमन दलाचे 1 अधिकारी व 05 फायरमॅन टेंडर व्हेन व ऍम्ब्युलन्स असे हजर होते.
फोटो ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पथक दंगा काबु योजनेची रंगीत तालीम करताना

Leave a Reply

Your email address will not be published.