जागतिक पुस्तक दिन साजरा..
जागतिक पुस्तक दिन साजरा
पनवेल दि २२, (वार्ताहर):जागतिक पुस्तक दिन व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने सत्याग्रह कॉलेज,सिद्धार्थ मल्टीपरपज रेसिडेन्शल हायस्कुल,अजिंठा इंटरनॅशनल स्कुल यांच्या माध्यमातुन दि.23 रोजी 12 तास वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती
या स्पर्धेत तीन गट पाडण्यात आले होते.पहिला गट आठवी ते बारावी ,बारावी ते पदवीधर दुसरा गट तसेच खुला गटात हि स्पर्धा पार पडली.नवी मुंबई,मुंबई मधील विद्यार्थी तसेच नागरिकांना या स्पर्धेत मोफत प्रवेशाची संधी देण्यात आली.शनिवारी सकाळी 9 वाजता या स्पर्धेला खारघर सत्याग्रह महाविद्यालयातील शांताबाई रामराम सभागृहात सुरुवात झाली.या स्पर्धेतील स्पर्धकांना सहा तास वाचन केल्यास स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.6 ते 8 तास वाचन केल्यास दोन हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.8 ते 10 तास वाचन केल्यास तीन हजार रुपये ,10 ते 12 तास वाचन करणाऱ्यास चार हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.स्पर्धेच्या संपूर्ण काळावधी पूर्ण करून 12 तास अभ्यास करणाऱ्या स्पर्धकाला त्याच्या वाचनावर आधारित प्रश्न विचारून त्या पुस्तकाची उजळणी करण्यात येणार आहे.या प्रश्नांना उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यास 5 हजार रुपये तसेच पुस्तक व प्रमाणपत्र भेट देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक डॉ जी के डोंगरगावकर यांनी दिली.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 94 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.12 तासाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना अल्पोपहार,जेवण,चहा साठी वेळ राखीव ठेवण्यात आला होता.वाचन,शिक्षणाचे महत्व समाजातील प्रत्येक घटकांना कळावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डोंगरगावकर यांनी दिली.महाविद्यालयातील तीन हजार पुस्तकांचा संग्रह असलेल्या वाचनालयातुन स्पर्धकांना पुस्तक पुरविण्यात आली होती.