*जेष्ठ लेखक, नाटककार, कथाकार जयंत पवार यांच्यावर आधारलेल्या गौरव ग्रंथाचे मुखपृष्ठ चित्रकार रुपेश पाटील यांनी साकारले!*
जेष्ठ लेखक, पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक ज्यांच्या अनेक कथा, कादंबऱ्या, ज्यांच्या लेखनातून ‘लालबाग परळ’ लवकरच येणारा ‘ भाऊबळी’ चित्रपट सारखे अनेक मराठी चित्रपट निर्माण झाले ते जेष्ठ लेखक जयंत पवार !
त्यांचे गेल्यावर्षी निधन झाले आणि मराठी नाट्यक्षेत्र, चित्रपट क्षेत्र आणि मराठी साहित्यातील एक मोठी व्यक्ती महाराष्ट्राने गमावली !
त्यांच्या लेखनाला भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली म्हणून त्यांच्या जीवनावरील आधारलेला आणि त्यांच्या लेखनाचा गौरव म्हणून मराठी क्षेत्रातील अनेक नामवंत लेखक,रंगनाथ पठारे, विजय केंकरे, राजीव नाईक, समर खडस, माया पंडित, अफाअत खान, कमलाकर नाडकर्णी, राजीव जोशी, रणधीर शिंदे या आणि अशा इतर प्रतिथयश जेष्ठ साहित्यकर्मी, रंगकर्मी यांचे लेख, तसेच जयंत पवार यांची निवडक नाट्य समीक्षा, प्रस्तावना, लेख मुलाखत, कविता यांचा समावेश असलेला हा जीवन ग्रंथ निर्माण झाला आहे !
इतक्या महान थोर लेखकांचे विचार आणि लेखन असलेल्या ह्या ग्रंथरूपी पुस्तकाचे मुखपृष्ठ करण्याचे भाग्य मला मिळाले म्हणून मी भाग्यवान आहे !
ह्या मुखपृष्ठाद्वारे जयंत पवार यांचे जीवन संघर्षमय होते, गिरणी कामगारांच्या जीवनावर भेदकपणे लिहिलेले आणि त्याच लढ्यातून ते पुढे आलेले लेखन आहे तसेच ते प्रयोगशील होते, सर्जनशील होते आणि तसेच ते लेखन थेट आणि भेदक होते, उठाव करणारे होते हे दाखविण्याचा प्रयत्न मी चित्राद्वारे केला आहे !
ह्या ग्रंथाचे मुखपृष्ठ करण्याचे औचित्य मला दिले त्या बाबत मी ह्या ग्रंथाचे निर्माते ‘प्रयोग मालाड’ ह्या संस्थचे आभार मानतो !