शिवसेना पुरस्कृत स्व.सौ.पुष्पा शिरीष घरत यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबीर..

शिवसेना पुरस्कृत स्व.सौ.पुष्पा शिरीष घरत यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबीर..

पनवेल / प्रतिनिधी : –
शिवसेना पुरस्कृत श्रीपुष्प प्रतिष्ठान फाउंडेशन अंतर्गत स्व.सौ.पुष्पा शिरीष घरत यांच्या स्मरणार्थ मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन खारघर येथे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यावतीने करण्यात आले आहे.

शिबिरामध्ये रक्तदान,आरोग्य तपासणी अंतर्गत- उंची, वजन, उच्च रक्तदाब, दंत ,नेत्र तपासणी व मोफत फ्रेम वाटप, त्याचप्रमाणे मधुमेह व व्हेमोग्लोबीन तपासणी करण्यात येणार आहे.
महाआरोग्य शिबीर हे साईधाम बिल्डिंग, पहिला मजला, साई मंदिराजवळ सेक्टर- ३ बेलपाडा खारघर येथे गुरुवार दि.२४ मार्च २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून अधिक माहितीसाठी ९७६९६२९५१० या नंबरवर संपर्क करावा.

सदर महाआरोग्य शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी घेण्याचे आवाहन शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.