रिपब्लिकन सेना रायगड जिल्हाध्यक्ष जीवनभाई गायकवाड यांचा विशेष सत्कार.

शिवसेना कळंबोली शाखेच्या वतीने शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेना रायगड जिल्हाध्यक्ष जीवनभाई गायकवाड यांचा विशेष सत्कार
पनवेल (वार्ताहर)- शिवसेना कळंबोली शाखेच्या वतीने अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेना रायगड जिल्हाध्यक्ष जीवनभाई गायकवाड यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थित शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील यांच्या समवेत जमीलभाई खान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हिंदुस्थान मथाडी जनरल कामगार व ट्रान्स्पोर्ट संघटना, राजेश केणी पनवेल तालुका मथाडी कामगार सेना,प्रदीप ठाकूर पनवेल विधानसभा समन्वयक,सचिन मोरे जिल्हाप्रमुख माथाडी कामगार सेना ,डी एन मिश्रा शहर प्रमुख कलबोली,गिरीश धुमाल शहर समन्वयक,अरविंद कडव शहर संघटक,संजय सावत शहर संघटक आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जमीलभाई खान यांना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हिंदुस्थान मथाडी जनरल कामगार व ट्रान्स्पोर्ट संघटना पदी निवड झाल्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.