अतरंगी अ वर्ग ‘५ वी ते १० वी अ वर्ग ८५ ची बॅच.
‘अतरंगी अ वर्ग ‘
पनवेल : आशिष गुप्ते यांच्या व्हि के हायस्कूल, पनवेल ५ वी ते १० वी अ वर्ग ८५ ची बॅच वर्गात घडलेले विनोदी किस्से यावरती लिहिलेल्या ‘अतरंगी अ वर्ग ‘ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ विनोदी लेखक व कवी अशोकजी नायगावकर यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात विनोदी किस्स्यान बरोबर त्याला साजेशी अशी कार्टून्स आणि मुखपृष्ठ ही स्वतः आशिष गुप्ते यांनीच काढले आहे. प्रकाशन सोहळ्याला दहावी अ वर्गा तील विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी साठे सर, बी पी म्हात्रे सर व सतपाळ सर आले होते. सदर प्रकाशन सोहळ्याला १० वी अ चे सर्व मित्र सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे कौतुक करताना नायगावकर म्हणाले गेट टुगेदर तर खूप होतात. पण शाळेतील किस्स्यांवर पुस्तक लिहून मित्रान बरोबर त्याचे प्रकाशन करणे असा कार्यक्रम प्रथमच झाला आहे. त्यांनी पुस्तकातील व्यंगचित्रांचेही खूप कौतुक केले. पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानंतर अशोक नायगावकर यांचा मिश्किली व कविता हा सदाबहार विनोदी कार्यक्रम झाला. मित्रांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व सहभाग आणि नायगावकर यांचा खुमासदार शैलीतील कार्यक्रम यामुळे हा सोहळा अधिकच रंगतदार झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा गुप्ते यांनी केले.