रायगड भुषण जितेंद्रबुवा म्हात्रे यांचा केला आ.प्रशांत ठाकूर यांनी विशेष सत्कार.

रायगड भुषण जितेंद्रबुवा म्हात्रे यांचा केला आ.प्रशांत ठाकूर यांनी विशेष सत्कार
पनवेल, दि.21 (संजय कदम) ः गोवठणे गावचे सुपूत्र जितेंद्र अनंत म्हात्रे यांना नुकतेच रायगड जिल्हा परिषदेेतून रायगड भूषण या पुरस्काराने अभिभूत करण्यात आले. याबद्दल पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तालुक्यातील अरिहंत सोसायटी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात समस्त पनवेल गुरुद्वाराच्या वतीने रायगड भूषण जितेंद्रबुवा म्हात्रे यांचा सत्कार आ.प्रशांत ठाकूर यांच्या मार्फत करण्यात आला. जितेंद्रबुवा म्हात्रे यांना अभिजात संगिताची आवड आहे. प्राथमिक संगीत शिक्षण आपल्या वडिलांकडून घेवून संगीत कलेची वाटचाल सुरू केली आहे. प्रख्यात गायक शंकरबुवा म्हात्रे आणि निवृत्तीबुवा चौधरी या गुरुंकडून मार्गदर्शन घेवून संगीत कलेत त्यांनी आपले नाव कोरले. जितेंद्र बुवा यांनी आतापर्यंत भजन, अभंगवाणी, नाट्यगीत, भावगीत, सुगम संगीताचे सर्वश्रृत असे कार्यक्रम मुंबई, नवी मुंबई केले आहेत. अनेक सामाजिक, सांस्कृतिक व सेवाभावी संस्थेमध्ये न्यायदानाचे पवित्र काम केले आहे. मराठी वाहिनीवर त्यांनी भजन कला सादर केली आहे. तसेच नाटकांमध्ये संगीतकार म्हणून कार्य केले आहे. अनेक भजन मंडळांना स्वर, लय, ताल या नावाने अनेक शिष्यांना न्यायदानाचे कार्य करीत आहेत. आतापर्यंत त्यांना उरण भुषण, समाजभुषण, आदर्श शिक्षक असे पुरस्कार मिळाले आहे. कोणत्याही कार्यातील नियोजनबद्धता व अंमलबजावणी ही वाखणण्याजोगी असते. कोणतेही कार्य पुर्णत्वास नेण्यासाठी ते प्रयत्नशील राहतात. त्यांनी संगीत क्षेत्रात अधिकाधिक व्यापकता निर्माण करून सरस्वती देवीची सेवा करून आगामी काळात सुद्धा त्यांनी चांगले शिष्य निर्माण करावेत अशा शुभेच्छा आ.प्रशांत ठाकूर यांनी त्यांना दिल्या आहेत. याबद्दल पनवेल महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.