डोंबिवली हददीत दहशत पसरविणारा अट्टल गुन्हेगारावर होणार करवाई..

( मानपाडा पोलीस स्टेशन , डोंबिवली चे हददीत दहशत पसरविणारा अट्टल गुन्हेगारावर मा . पोलीस आयुक्त , ठाणे शहर यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई केलेबाबत . ‘ — 000000 — मानपाडा पोलीस ठाणे , डोंबिवली हद्दीतील कुप्रसिध्द गुंड त्रिशांत दिलीप साळवे , वय – २४ वर्षे , रा . जय मल्हार नगर , देशमुख होम समोर , टाटा नाका , पिसवली , ता . कल्याण , जि . ठाणे याचेवर शिवीगाळ , दमदाटी , मारहाण , महिलांचे विनयभंग , गंभीर दुखापत करणे , घातक शस्त्र वापरुन दंगा करणे , सरकारी नोकरास मारहाण करणे , दंगा करुन मालमत्तेचे नुकसान करणे , गृह अतिक्रमण करून आपखुषीने दुखापत करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे , ई . शरीरा विरूध्द गंभीर स्वरूपाचे एकुण ८ गुन्हे मानपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल असल्याने त्याचेविरूध्द एम.पी.डी. ए . कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई करून त्यास दि . १७/०३/२०२२ रोजी मध्यवर्ती कारागृह , नाशिक येथे १ वर्षाकरिता स्थानबध्द करण्यात आले आहे . प्राप्त प्रस्ताव व सहकागदपत्रांची पडताळणी करून श्री . जय जीत सिंह , पोलीस आयुक्त , ठाणे शहर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे , सह पोलीस आयुक्त , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , पोलीस उप आयुक्त गुन्हे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा पोलीस स्टेशन , डोंबिवली यांनी प्रस्ताव सादर करून व वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमपीडीए कक्ष , ठाणे शहर यांनी स्थानबध्दतेची कारवाई केलेली आहे . मा . पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी दहशत निर्माण करणा – या व सक्रीय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले असल्याने त्यानुसार सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी त्यांचेवर एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द करण्याची कारवाई यापुढे देखील करण्यात येणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.